World in Light Pollution. Photo- Flicker सुमारे पन्नास वर्षांपूर्वी गावाबाहेरील झाडाझुडपांवर मे-जून या महिन्यात रात्रीच्या वेळी काजव्यांचा लखलखाट सहज बघायला मिळायचा. इतकेच नव्हे तर, घराच्या अंगणातील झाडावरही काजवे त्यांचे दर्शन देऊन जायचे. निसर्गातील माणसांच्या हस्तक्षेपामुळे काजवे लोकवस्तीपासून दूर जायला लागले. मग काजवे बघण्यासाठी पर्यटन उद्योगाने खास “काजवा महोत्सव” सुरू केले. हजारो- लाखोंच्या संख्येने पर्यटक काजवा महोत्सवासाठी काजव्यांच्या निवासस्थानी एक-दोन रात्रीची वस्ती करून राहायला लागले. राहण्यासाठी तंबू, विजेचे दिवे, मोबाईलचे फ्लॅश, बॅटरीचे झोत, कॅमेऱ्याचे फ्लॅश, व्यवसायिक फोटोग्राफर, पर्यटकांच्या गाड्यांचे झगझगीत दिवे इत्यादींच्या प्रकाशाच्या प्रदूषणाने काजव्यांच्या आयुष्यावर परिणाम केला आणि काजवा महोत्सवापासून काजवे दूर जायला लागले. काजव्यांच्या व बारीक-सारीक जीवांच्या जीवनावर मानवनिर्मित प्रकाशाच्या प्रदूषणाने कसा विपरीत परिणाम होतो, याचे हे जिवंत उदाहरण होय. जलप्रदूषण, वायू प्रदूषण, आवाजाचे प्रदूषण, जमिनीचे प्रदूषण, किरणोत्साराचे प्रदूषण इत्यादी प्रदूषणे आपल्याला माहीत ...