"कैरो ६७८ " सार्वजनिक ठिकाणी महिलांवरील लैंगिक छळाच्या विरोधातील चित्रपट

आंतरराष्ट्रीय पातळीवर "कैरो 678" ने लैंगिक छळाविरुद्ध जागतिक चर्चेत भर घातली. यामुळे इतर देशांमध्ये महिलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर विचारमंथन होऊ लागले. चित्रपट अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये प्रदर्शित झाला आणि त्याने समाजाच्या विविध स्तरांवर चर्चा घडवून आणली.
नुकताच “कैरो ६७८” हा चित्रपट बघितला. काही गोष्टी करायच्या राहून जातात तसा गेली १५ वर्षे हा चित्रपट बघायचे राहून गेले होते. “कैरो 678” हा इजिप्तमधील 2010 साली प्रदर्शित झालेला चित्रपट असून, त्याचे दिग्दर्शन आणि लेखन मुहम्मद दियाब यांनी केले आहे. हा चित्रपट लैंगिक अत्याचार, सार्वजनिक ठिकाणी होणारी छेडछाड, आणि त्याविरुद्ध महिलांच्या संघर्षावर भाष्य करतो. चित्रपट सामाजिक आणि सांस्कृतिक दबावाला तोंड देत संघर्ष करणाऱ्या महिलांच्या धैर्याची प्रेरणादायी कथा सांगतो.

चित्रपट तीन महिलांच्या कथा एकत्रितपणे सांगतो. त्या महिला इजिप्तच्या सामाजिक परिस्थितीशी सामना करत असतात. त्यांच्या जीवनात होणाऱ्या लैंगिक छाळावर आधारित त्यांचा लढा आणि संघर्ष यात दिसून येतात.

1. फैजा – ही गरीब आर्थिक परिस्थितीतून आलेली एक सामान्य गृहिणी आहे. टॅक्सी परवडत नाही म्हणून ती बसने प्रवास करते. तिला सार्वजनिक बसमध्ये वारंवार लैंगिक छळाला सामोरे जावे लागते. ती सुरुवातीला शांत राहण्याचा प्रयत्न करते, पण नंतर आपल्या सुरक्षिततेसाठी ती परत प्रत्युत्तर देण्याचे ठरवते.

2. सेबा: उच्चभ्रू वर्गातून आलेली, एक स्वतंत्र विचारांची महिला, जी आपल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचारामुळे मानसिक आघातातून जात आहे. ती स्वतःला सावरण्यासाठी इतर महिलांना आत्मरक्षणाचे धडे देण्यास सुरुवात करते.

3. निली: एक धाडसी आणि आधुनिक विचारसरणीची स्टँडअप कॉमेडियन आहे. ती इजिप्तमध्ये महिलांच्या हक्कांसाठी लढा देत आहे. तिला देखील छेडछाड आणि असमानतेशी झुंज द्यावी लागते, पण ती त्याविरोधात आवाज उठवते.

या महिलांची कथा एका क्षणी एकत्र येते. त्या महिला आपापल्या परिस्थितीवर मात करून एकत्र येण्याचा निर्णय घेतात. त्या छळ करणाऱ्यांना शिक्षा देण्यासाठी आणि समाजात महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा उचलण्यासाठी संघर्ष करतात. फैजाचा प्रतिशोध/ बदला तिच्या हिंसक कृतींमधून दिसतो, जेव्हा ती छेडछाड करणाऱ्यांवर हल्ला करते. कैरो 678 चित्रपट लैंगिक अत्याचारांच्या गंभीरतेवर प्रकाश टाकतो आणि स्त्रियांनी आपल्या हक्कांसाठी आवाज उठवला पाहिजे, हा संदेश देतो. इजिप्तसारख्या पुरुषप्रधान समाजात, महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि समानतेसाठी सुरू असलेल्या लढ्याचा हा महत्वाचा टप्पा आहे.


हा चित्रपट यु-ट्यूब वर उपलब्ध आहे. BDFIX या चॅनलवर https://www.youtube.com/watch?v=cyArQ_ndx0s या लिंक वर.

चित्रपट "कैरो 678" (2010) ने इजिप्तमधील लैंगिक छळविरोधी चर्चेचा पाया मजबूत केला. विशेषतः या चित्रपटाने महिलांवरील अत्याचाराची भयंकर परिस्थिती आणि समाजाच्या उदासीनतेवर प्रकाश टाकला. चित्रपटातील तीन मुख्य पात्रांच्या संघर्षांमुळे लोकांमध्ये जागरूकता निर्माण झाली, ज्यामुळे इजिप्तमध्ये पहिले "लैंगिक छळविरोधी कायदे" लागू करण्यास प्रवृत्ती मिळाली.

2014 मध्ये इजिप्त सरकारने एक कायदा मंजूर केला, ज्यामध्ये लैंगिक छळ म्हणजे फौजदारी गुन्हा मानण्यात आला. याअंतर्गत दोषींना सहा महिने ते पाच वर्षांपर्यंतच्या कैदेची शिक्षा आणि आर्थिक दंड अशी तरतूद करण्यात आली. हा कायदा तयार करण्यासाठी "कैरो 678" आणि त्यावर आधारित सार्वजनिक दबाव यांचा महत्त्वाचा वाटा होता

आंतरराष्ट्रीय पातळीवर "कैरो 678" ने लैंगिक छळाविरुद्ध जागतिक चर्चेत भर घातली. यामुळे इतर देशांमध्ये महिलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर विचारमंथन होऊ लागले. चित्रपट अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये प्रदर्शित झाला आणि त्याने समाजाच्या विविध स्तरांवर चर्चा घडवून आणली.

चित्रपटातील महिलांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी घेतलेल्या मार्गांवर काही लोकांनी विरोधही व्यक्त केला. हिंसक विरोध मान्य करण्यासारखा नाही. तथापि छळाला बळी पडणाऱ्या महिलांसमोर दुसरा पर्यायही दिसत नाही. या चित्रपटाने अनेकांना प्रेरणा दिली की, लैंगिक छळासमोर शांत राहण्याऐवजी याला विरोध करणे गरजेचे आहे. तथापि छळ करणाऱ्या पुरुषांच्या मानसिकतेवर व ती बदलण्यासाठी काय करावे यावर प्रकाश टाकलेला नाही. चित्रपटाचा शेवट प्रेक्षकांना विचार करण्यास भाग पाडतो. महिलांची मानसिक आणि भावनिक अवस्था आणि समाजात बदल घडवून आणण्यासाठी लागणारी इच्छाशक्ती यावर भर देतो.

शेवटी सांगायचे इतकेच की प्रस्तुत चित्रपट अनेकांनी पाहावा व त्यावर विचार करावा. मूळ भाषेतील चित्रपट इंग्रजी सबटायटलमुळे सहज समजून येतो. चित्रपटाची लिंक पुढे देत आहे. हा चित्रपट OTT वर सुद्धा मिळू शकेल.


युनायटेड नेशन्स च्या साईट वरील ट्रेलर 

===== O =====

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुप्रसिद्ध विज्ञानवादी लेखक आणि वैद्यकीय तज्ज्ञ शंतनू अभ्यंकर कालवश

अमेझॉन चित्रपट 'ऐ वतन मेरे वतन': पाहायलाच हवा असा अप्रतिम चित्रपट

बाबा वेंगा यांच्या खोट्या भविष्यवाण्या