सुप्रसिद्ध विज्ञानवादी लेखक आणि वैद्यकीय तज्ज्ञ शंतनू अभ्यंकर कालवश
विनम्र आदरांजली
सुप्रसिद्ध विज्ञानवादी लेखक आणि वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. शंतनू अभ्यंकर यांचे वयाच्या ६० व्या वर्षी गुरुवारी दि.१५ ऑगस्ट २०२४ रोजी निधन झाले. शंतनू अभ्यंकर यांना फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णायलात उपचार सुरू होते. त्यांच्या जाण्याने साहित्य, समाजसेवा, वैद्यकीय आणि कला क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. शास्त्रज्ञ आजीच्या गोष्टी,आधुनिक वैद्यकीची शोधगाथा, अशी विविध विषयांवरील खालील पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्यामागे वडील डॉ. शरद अभ्यंकर, आई मीराताई, एक भाऊ, पत्नी डॉ. रूपाली, मुलगा डॉ. मोहित, विवाहित मुलगी डॉ. अनन्या, नात असा परिवार आहे. त्यांच्या पत्नी रुपाली या डोळ्यांच्या डॉक्टर आहेत. त्यांचा मुलगा मोहित नि मुलगी अनन्या दोघे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत.
+
वरील व्हिडिओ Against All Odds: The Journey of Dr. Shantanu Abhyankar I Smiling Through Adversity हा - Davprabha Films & Productions या चैनेल वरील आहे.
शंतनू अभ्यंकर यांचा जन्म १४ एप्रिल १९६४ रोजी झाला. त्यांनी पुण्यातील बैरामजी जीजीभॉय अर्थात बी. जे. मेडिकल महाविद्यालयातून वैद्यकीय पदवी (MBBS) व स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र या विषयात एम.डी. ही पदवी संपादन केली होती. त्यानंतर वाईत ' मॉडर्न क्लिनिक ' च्या माध्यमातून ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा सुरू केली. अभ्यंकर १९९७ सालापासून सातारा जिल्ह्यातील वाई येथे वैद्यकीय व्यवसायात कार्यरत होते. शंतनू अभ्यंकर हे प्रसिद्ध डॉक्टर, लेखक, भाषांतरकार, नाटककार असे चौफेर व्यक्तिमत्व होते. तीन आठवड्यापूर्वीच त्यांनी ऑर्गन डोनेशन करण्याचा फॉर्म भरला होता. त्यानुसार डॉ. अभ्यंकर यांनी मृत्यूपश्चात दोन्ही डोळ्यांचे कॉर्निया दान केले.
त्यांना असलेल्या तीव्र सामाजिक जाणीव यामुळे विज्ञानवादी, वैज्ञानिक जाणीव यांचा प्रसार होण्यासाठी विविध सामाजिक पुरोगामी संस्थांसोबत ते कार्यरत होते. विविध लोकप्रिय वर्तमानपत्रांतून आणि अनेक सभा संमेलनातून महिलांच्या आरोग्यावर तसेच समाजाला भेडसावणाऱ्या प्रश्नांवर ते लिहित असत. ते स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र-तज्ज्ञ होते. त्यांची स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र-तज्ज्ञ संघटनेच्या संचालक मंडळात, तसेच राष्ट्रीय कामविज्ञान समितीच्या सचिवपदी नियुक्ती झाली होती. अभ्यंकर यांनी स्त्री प्रश्नांवर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये भूमिका मांडली. वाई येथील प्राज्ञ पाठ शाळा मंडळाचे ते विश्वस्त होते. तेथील अनेक प्रकल्पांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. लोकमान्य टिळक स्मारक संस्थेचे ते अध्यक्ष होते. वसंत व्याख्यानमाला आणि प्रतीक थिएटरचे ते माजी अध्यक्ष होते.
ते खूप हसत खेळत कोणताही विषय सहज-सोप्या भाषेत मांडायचे, त्याचबरोबर भाषांतरकार तसेच ब्लॉग लेखक आणि नाटककार अशीही त्यांची विशेष ओळख होती. स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र-तज्ज्ञ संघटनेच्या संचालक मंडळात, तसेच राष्ट्रीय कामविज्ञान समितीच्या सचिवपदी त्यांची नियुक्ती झाली होती. स्त्रियांच्या आरोग्याबाबतीतल्या भरीव कामगिरीसाठी महाराष्ट्र शासनातर्फे २००७ मध्ये डॉ. आनंदीबाई जोशी गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. ते अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे सातारा जिल्हाध्यक्ष राहिले होते. शकुंतला परळकर सेवा व्रती डॉक्टर पुरस्कार, वाई वैद्यक भूषण पुरस्कारानेही त्यांना गौरविण्यात आले होते. तसेच अनेक संस्थांमध्ये कार्यरत असणारे असे उत्तुंग बहुआयामी व्यक्तिमत्व होते.
डॉ शंतनू अभ्यंकर यांनी लिहिलेली काही पुस्तके- आधुनिक वैद्यकीची शोधगाथा, शास्त्रज्ञ आजीच्या गोष्टी, मला शास्त्रज्ञ व्हायचं आहे, आधुनिक वैद्यकीची शोधगाथा, शास्त्रज्ञ आजीच्या गोष्टी, डॉ क्युटरस, राधिका सांत्वनमहे, बायकात पुरुष लांबोडा, डॉक्टरांना भेटलेल्या खुमासदार माणसांबद्दल, डॉक्टर टेरेसा आणि इतर वल्ली, आधुनिक वैद्यकीची शोधगाथा, गरोदरपणात ग्रहण का पाळू नये, पाळी मिळी गुपचिळी, आरोग्यवती भव, फादर टेरेसा आणि इतर वल्ली, बायकात पुरुष लांबोडा हे अनुभवकथन त्यांनी लिहिले. आयन रँड च्या द नाईट ऑफ जानेवारी सिक्सटीन्थ चे रात्र सोळा जानेवारीची हे भाषांतरित नाटक त्यांनी लिहिले. रिचर्ड डॉकिन्सच्या द मॅजिक ऑफ रियालिटी चा अनुवाद जादुई वास्तव प्रसिद्ध आहे. डॉ संदीप श्रोत्री यांच्या KASS-The Platue of flowers चे पुष्प पठार कास, डॉ अनिल जोशी यांच्या Immortal Remains चे अपार्थिव, जॅरेड डायमंड यांच्या "Why is sex fun" चे संभोग का सुखाचा भाषांतर त्यांनी केले. मुद्दूपलनी विरचित तेलगू दीर्घ काव्याचा "राधिका सांत्वनमचा" इंग्रजीतून मराठीत छंदबद्ध अनुवाद केला नि त्याचं डॉ शंतनू आणि डॉ रुपाली शंतनू यांनी केलेले विलक्षण सुरेख सादरीकरण सुद्धा केले. विविध वृत्तपत्रे, नियतकालिके, समाज माध्यमांवरही ते सातत्याने लेखन करत होते. "शंतनू उवाच" हा त्यांचा प्रचंड वाचला जाणारा ब्लॉग आहे. https://shantanuabhyankar.blogspot.com/ . तसेच त्यांचे Shantanu Abhyankar नावाचे https://www.youtube.com/@shantanuabhyankar3466 हे युट्युब चानेलसुद्धा प्रसिद्ध आहे.
त्यांनी वाई येथील महिला स्नेहसंवर्धन समाजाच्या बालकमंदिरात मराठी माध्यमातून शिक्षण घेतले होते. वाई येथे त्यांनी सरस्वती वाचनालय आणि हनुमान व्यायामशाळा त्यांच्या घरात सुरु केले होते. पाचवीत पाचगणीच्या संजीवन हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला होता. त्यानंतर पुण्याच्या एस पी कॉलेजला प्रवेश घेतला. एम बी बी एस चा प्रवेश हुकला म्हणून नाईलाजास्तव होमिओपथिला प्रवेश घेतला. तेथे विज्ञान आणि होमिओपॅथी यांच्यातील विरोधाभास त्यांना रोज दिसू लागला. घरातील बुद्धिप्रामाण्यवादाचे संस्कार. वाचलेलं आधुनिक वैद्यकीय शास्त्राचे ज्ञान आणि दुसर्या बाजूला होमिओपॅथी अभ्यासक्रमातील विज्ञानाच्या नावावरील प्रचंड अतार्किक गोष्टी. शिक्षकांना प्रश्न विचारत, आधुनिक वैद्यक ज्ञानाशी ताडून बघण्यात पाच वर्षेहोमिओपॅथी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी गेली. पदवी मिळाली तरी डॉ हे बिरूद आपल्या नावामागे लावावे असे त्यांना वाटेना. या सगळ्या अभ्यासातून, चिंतनातून लेखकाने होमिओपॅथीबद्दल साधारण तीन निष्कर्ष काढले. एक होमिओपॅथी हे भ्रामक विज्ञान आहे. दोन होमिओपॅथी ही पॅथी फक्त अवैज्ञानिक नाही तर ती विज्ञानविरोधी आहे. तीन होमिओपॅथीचा जनक हानीमान यांचे व्यक्तिस्तोम माजवून त्यांचे दैवतीकरण करणारे आहे आणि व्यक्तिस्तोम आणि दैवतीकरण हे विज्ञान असू शकत नाही.
होमिओपॅथीचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर आणखी सखोल वैज्ञानिक ज्ञान घेण्याच्या लालसेने लेखकाने ICR या होमिओपॅथीच्या संशोधन संस्थेकडे परीक्षा दिली. पण तिथे अपयश आले. त्याचे कारण फक्त १०% प्रश्न होमिओपॅथीचे होते. मध्यंतरी लेखक अंधश्रद्धा निर्मुलन समितीने घेतलेल्या जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील शिबिरास उपस्थित राहिले. त्यावेळेस त्याच्या हातात पडला जानेवारी १९८७ चा Illustreted weekly of india चा अंक त्यात against all odds हा लेख वाचण्यात आला. विपरीत जगण्याशी लढा देत यशस्वी आयुष्याकडे प्रवास केलेल्या व्यक्तिमत्वांच्या खऱ्या गोष्टी त्यात होत्या. त्यातून त्यांचा आत्मविश्वास वाढला. दरम्यान त्या वेळी एक बातमी त्याच्या वाचनात आली. सुप्रीम कोर्टाच्या एम बी बी एस प्रवेश निवाड्याची. यापुढे देशभरातून १५ टक्के जागा या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा परीक्षेतून भरण्यात याव्या हा कोर्टाचा आदेश होता. राष्ट्रीय स्पर्धा परीक्षेला बसायचं, व यशस्वी व्हायचे असे ठरले. पाच वर्षे होमिओपॅथीचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला असताना पुन्हा बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारित स्पर्धा परीक्षा देणे आणि यात यशस्वी झाल्यास पुन्हा नऊ वर्षे पाठीमागून नव्याने देणे हा फक्त धाडसी निर्णय नव्हता, तर नवे आधुनिक वैद्यकीय ज्ञानाची मिळवण्याची प्रचंड आस ही त्यामागील प्रेरणा होती. ते प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाले नि त्याच्या आवडत्या बी जे मेडिकलला त्यांनी प्रवेश घेतला. एमबीबीएस नंतर स्त्री आरोग्य आणि प्रसूती शास्त्र या विषयातील पदव्युत्तर शिक्षण घेतले. गंडे-दोरे, मंत्र-तंत्र, अंगारे धुपारे, पूजाअर्चा यांच्या वाटेस कधीही न जाता प्रचंड चिकाटी, प्रामाणिकपणा, विचाराशी बांधिलकी आणि श्रम या जोरावर त्यांनी शिक्षण व व्यवसाय यशस्वी रीतीने पार पाडले.
डॉ. शंतनू अभ्यंकर यांच्या मुलाखतीचे दोन व्हिडिओ भाग-१ व भाग २ - Think Bank या चैनेल वर-
भाग- १- हिंदू असण्यासाठी देव मानावाच लागतो? । Dr. Shantanu Abhyankar | Behind The Scenes | Think Bankभाग- २ - लोकांचा डॉक्टरांवरचा विश्वास का उडतोय? | Dr. Shantanu Abhyankar | EP - 2/2 | Behind The Scenes