बाबा वेंगा यांच्या खोट्या भविष्यवाण्या


बाबा वेंगा या रशियन महिलेच्या नावाने अनेक भविष्यवाण्या अधूनमधून प्रकाशित होत असतात. २०२४ मध्ये पृथ्वी स्वतःच्या कक्षेतून भरकटेल आणि वेगळ्याच कक्षेतून जाईल. त्यामुळे हवामान बदलाचे परिणाम गंभीर होतील. रेडिएशनचा धोका वाढेल.असे तिचे भविष्य कथन मागील वर्षी २०२३ मध्ये गाजले होते. २०२४ मध्ये रशिया जगाचा सम्राट बनेल आणि युरोप 'ओसाड जमीनी ' मध्ये बदलेल. रशियाला कोणीही रोखू शकणार नाही. रशिया सर्वांना त्याच्या मार्गावरून दूर करेल आणि जगावर राज्य करेल. युद्धात जैविक हल्ले होतील, युरोपमध्ये दहशतवादी हल्ले होतील आणि तिसरे महायुद्ध होईल. असेही त्यांनी म्हटले होते अशा बातम्या आल्या होत्या.

बाबा वेंगा म्हणून प्रसिद्ध असलेल्या महिलेचे मूळ नाव वांगेलिया पांडेवा गुश्तेरोवा असे होते.त्यांचा जन्म ३ ऑक्टोबर १९११ रोली बल्गेरिया या देशात झाला. ११ ऑगस्ट १९९६ रोजी त्यांचा मृत्यू झाला.. लहानपणी एका चक्रीवादळात सापडून डोळ्यात कचरा, वाळू जाऊन त्यांची दृष्टी गेली आणि 16 व्या वर्षी त्यांना भविष्यवाणी करण्याची क्षमता मिळाल्याचा दावा केला गेला. पहिल्या महायुद्धात त्यांचे वडील बल्गेरियन सैन्यात होते., तर बालपणीच त्यांच्या आईचे निधन झाले. यामुळे तिच्या तरुणपणाचा बराचसा काळ शेजारी आणि जवळच्या कौटुंबिक मित्रांच्या आधाराने गेला. युद्धानंतर तिच्या वडिलांनी पुनर्विवाह केला, त्यामुळे तिला सावत्र आई मिळाली.

तरुणपणी त्या वनस्पतींची, झाडपाल्यांची, पारंपरिक औषधे देत. त्यामुळे त्यांच्याकडे बरेच लोक येत असत. दुसऱ्या महायुद्धाची त्यांनी भविष्यवाणी केली होती, असे म्हणतात. पण इतिहाच्या अभ्यासकांनाही युद्धाची शक्यता वाटत होती. त्यांनी मात्र वेंगाप्रमाणे गुढतेचा आव आणला नाही. भविष्य सांगण्याच्या कथित क्षमतेने लोकांना त्यांनी आकर्षित केले. युद्धात गेलेले. त्यांचे नातेवाईक जिवंत आहेत की नाही किंवा ते कोठेतरी मेले याचा शोध घेण्यासाठी अनेक लोक तिला भेटायला येऊ लागले. दुसऱ्या महायुद्धादरम्यान त्यांनी अनेक अचूक भविष्यवाण्या केल्या असे म्हटले जाते. त्यामुळे त्या प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचल्या. त्यांच्या भविष्यात चेर्नोबिल आपत्ती आणि त्सुनामी यांचा समावेश होता, असे म्हणतात.

तिचा नवरा गुश्तेरोव्ह दारूच्या आहारी गेला, आजारी पडला, आणि अखेरीस 1 एप्रिल 1962 रोजी मरण पावला. पण त्याचे भविष्य तिला सांगता आले नाही.. ११ ऑगस्ट १९९६ रोजी स्तनाच्या कर्करोगाने वेंगाचा मृत्यू झाला. पण हेही भविष्य त्यांनी सांगितले नाही. पण राजकुमारी डायना, स्टालिन, झार बोरिस तिसरा यांच्या मृत्यूच्या तारखा तिने सांगितल्याचे तिचे अनुयायी सांगतात. जर्नल मेट्रो - चे स्तंभलेखक जेफ येट्स यांच्या मते , तिच्या कथित भविष्यवाण्यांची कोणतीही लेखी नोंद नाही, परंतु तिचे अनुयायी वारंवार तिला वेगवेगळ्या भविष्यवाण्यांचे श्रेय देतात

तथापि, लक्षात घेण्यासारखी महत्त्वाची बाब म्हणजे त्यांच्या भविष्यवाण्या अस्पष्ट आणि विस्कळीत होत्या. त्यांच्या भविष्यवाण्यांत अचूकता, वैज्ञानिक पुराव्यांचा अभाव होता. .ज्यामुळे त्यांचा काहीही अर्थ लावणे शक्य होते लोकांनी त्यांचे स्वतःच्या मताप्रमाणे काहीही अर्थ लावले. त्यांच्या अनेक भविष्यवाण्या पूर्णपणे चुकीच्या ठरल्या, तरीही त्यांच्या भक्त लोकांनी त्यांचा उदोउदो सुरूच ठेवला. बाबा वेंगा यांच्या जीवनावर आणि भविष्यवाण्यांवर अनेक पुस्तके आणि लेख लिहिले गेले आहेत.. त्यांच्या भविष्यवाण्यांबद्दल अनेक वादविवाद आहेत, काही लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात तर काही टीका करतात.

दोन स्टीलचे पक्षी आमच्या अमेरिकन बांधवांवर धडकतील. झाडाझुडपातून लांडगे ओरडतील आणि नद्यांमधून निष्पापांचे रक्त वाहू लागेल.- त्यांचे हेही कथन होते. त्याचा अर्थ 11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेला हल्ला, याच्याशी लावण्यात आला. विमानांना स्टीलचे पक्षी समाजणे हा अतिरेकी कल्पनाविलास होय. “एक विषाणू आपल्या सर्वांना पिंजून काढेल,” याचा अर्थ कोरोनाच्या साथीबरोबर लावणे हेही हास्यास्पद आहे. विषाणूच्या साथी त्याआधीही आल्या होत्या. कदाचित पुढेही येतील.

आता आपण बाबा वेंगा यांच्या काही खोट्या ठरलेल्या भविष्यवाण्या बघू या...

बाबा वेंगा यांनी 2010 मध्ये सुरू होणाऱ्या आणि 2014 पर्यंत टिकणार्‍या तिसऱ्या महायुद्धाची भविष्यवाणी केली होती. यात रासायनिक शस्त्रे आणि अण्वस्त्रे वापरली जातील आणि युरोप पूर्णपणे नष्ट होईल असे त्यांनी म्हटले होते. 2024 पर्यंत, हे युद्ध घडले नाही.

2019 किंवा 2020 मध्ये रशियाला धडकणारा एक विशाल उल्कापात होईल असे भविष्य सांगितले होते. हेही घडले नाही.

2023 मध्ये एलियन / परग्रहवासी पृथ्वीवर आक्रमण करतील. पृथ्वीवर पूर्ण अंधार करणारे सौर वादळ येईल असे त्यांचे म्हणणे होते.. 2024 पर्यंत, हे दोन्ही घडले नाही.

2016 मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून निवडणूक होणारा व्यक्ती "काळा माणूस" असेल असे त्यांचे भविष्य होते. पण डोनाल्ड ट्रम्प, जे गोरे होते, ते निवडून आले.

2008 मध्ये, "द सन" या ब्रिटिश वृत्तपत्राने "2043 मध्ये युरोप मुस्लिम-बहुसंख्य बनेल" अशी शीर्षक असलेला लेख प्रकाशित केला. "बाबा वेंगा: द बल्गेरियन नॉस्ट्रॅडॅमस" या पुस्तकात लेखिका Rosemary Ellen Guiley यांनी हे विधान समाविष्ट केले आहे. या विधानाचा उल्लेख करणारे कोणतेही अधिकृत स्रोत नाहीत. बाबा वेंगा यांनी स्वतः हे विधान केल्याचे कोणतेही ज्ञात रेकॉर्ड नाही.

2012 पर्यंत ध्रुवीय बर्फ पूर्णपणे वितळेल असे म्हटले होते. 2024 पर्यंत, अजूनही बर्फ आहे. तो कमी होत आहे, पण पूर्ण नष्ट – असे म्हणणे चूक आहे..बाबा वेंगा यांच्या "2012 पर्यंत ध्रुवीय बर्फ पूर्णपणे वितळेल" या विधानाचा उल्लेख अनेक स्त्रोतांमध्ये आढळतो, उदाहरणार्थ-  (१) "The Complete Prophecies of Baba Vanga" by Svetla Dimitrova (2013) , (२)"Baba Vanga: The Bulgarian Mystic Who Saw the Future" by Maria Dimitrova (2016)  (३) "The Prophecies of Baba Vanga: What the Blind Bulgarian Mystic Saw for the 21st Century" by Sterling D. Gray (2011) BBC, CNN, The Guardian, The New York Times सारख्या अनेक आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांनी या विधानाचा उल्लेख केला.

हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की बाबा वेंगा यांच्या भविष्यवाण्या अस्पष्ट आहेत आणि त्यात तपशील कमी आहेत. त्यामुळे, चालू घडामोडीनुसार त्यांचा कसाही अर्थ लावणे सोपे होते. नास्त्राडोमस यांच्याही भविष्यवाण्या अशाच विस्कळीत, असंबंध वाक्यातून आल्या आहेत. त्यांच्याविषयी नंतर कधीतरी.

- धनंजय आदित्य

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुप्रसिद्ध विज्ञानवादी लेखक आणि वैद्यकीय तज्ज्ञ शंतनू अभ्यंकर कालवश

अमेझॉन चित्रपट 'ऐ वतन मेरे वतन': पाहायलाच हवा असा अप्रतिम चित्रपट